पालिकेच्या प्रसूतिगृहांवर सीसीटीव्हीचा वॉच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पालिकेच्या प्रसूतिगृहांवर आता सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. यामध्ये 14 रुग्णालयांत 185 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामुळे पालिका रुग्णालयात घडणाऱ्या चोरीसारख्या घटना, डॉक्टरांना होणारी मारहाण आणि मुले पळवण्याचा धोका टाळता येणार आहे.

पालिका रुग्णालयात डॉक्टरांना होणारी मारहाण आणि समाजविघातक शक्तींकडून असणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मागील हिवाळी अधिवेशनात मुंबई पालिकेने प्रसूतिगृहांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे निर्देश देण्यात आले होते. यासाठी पहिल्या टप्प्यात 135 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामध्ये 78 डोम कॅमेरे, 46 बुलेट कॅमेरे व 11 पीटीझेड कॅमेरे बसवण्यात येतील. यासाठी मे. समर्थ सिक्युरिटी सिस्टम इंडिया प्रा. लि. या कंपनीला दोन वर्षांकरिता कॉण्ट्रक्ट देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने दोन कोटी 58 लाख 96 हजार 420 रुपयांची तरतूद केली आहे.

असे बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे
:- नायगाव प्रसूतिगृह -9  :-प्रभादेवी प्रसूतिगृह – 7  :- ओशिवरा प्रसूतिगृह – 10 :- सूर्यकांत वगळ प्रसूतिगृह – 7 :- रिद्धी सिद्धी प्रसूतिगृह – 11 :- रावळी कॅम्प प्रसूतिगृह – 12 :- एसजीडीसी प्रसूतिगृह – 11 :-  सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह – 5 :-  मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसूतिगृह – 7 :- माँ साहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह – 11 :- देवनार प्रसूतिगृह – 8 :- केसीएल प्रसूतिगृह – 15 :- चिता कॅम्प प्रसूतिगृह – 11 :-  आनंदीबाई जोशी प्रसूतिगृह – 13 एकूण =135