मुंबई विमानतळ येथील सेलिबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रा.लि. कंपनीतील ज्ञानेश्वर सावंत या कामगाराचे 30 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. या पार्श्वभूमीवर भारतीय कामगार सेनेच्यावतीने सावंत कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली आहे. याबद्दल सावंत कुटुंबियांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.
भारतीय कामगार सेना सेलिबी नास युनिट, कंपनीतील सर्व कामगारांनी जमा केलेली रक्कम तसेच भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या प्रयत्नामुळे व्यवस्थापनाकडून मिळवून दिलेली अतिरिक्त रक्कम असे मिळून 5 लाख 86 हजार रुपयांचा मदत निधीचा धनादेश नुकताच ज्ञानेश्वर सावंत यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला. सावंत यांच्या ग्रॅज्युएटी आणि पीएफचे पैसे आणि त्यांच्या पत्नीला नोकरीसुद्धा मिळवून देणार असल्याचे भारतीय कामगार सेनेतर्फे सांगण्यात आले.
व्यवस्थापनाचे रमेश राऊत, ऋतुराज हिरेखान, त्याचबरोबर भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, योगेश आवळे, सहचिटणीस मिलिंद तावडे, नीलेश ठाणगे, युनिट कमिटी अध्यक्ष सुजित कारेकर, नरेंद्र दळवी, सुदर्शन वारसे, संतोष लखमदे, हेमंत नाईक, हरिश्चंद्र कराळे, रवी शेलार आदी या वेळी उपस्थित होते.