सेंट्रल बँक ऑफ इंडियात 350 जागांची भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 350 जागांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदाच्या 50 जागा आणि मार्पेटिंग ऑफिसर पदाच्या 300 जागांचा समावेश आहे. फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पूर्णवेळ पदवी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सकडून फॉरेन एक्सचेंज ऑपरेशन्सचे प्रमाणपत्र आणि पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, तर मार्पेटिंग ऑफिसर पदासाठी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पूर्णवेळ पदवी, एमबीए-पीजी डिप्लोमा आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण देशभरात असणार आहे. या दोन्ही पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अखेरची तारीख 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती https://ibpsreg.ibps.in या वेबसाईटवर देण्यात आली आहे.