उल्लू , ALTT, बिग शॉट्स सारख्या 25 अ‍ॅपवर बंदी; केंद्र सरकारकडून अश्लील कंटेंटवर कारवाई

मार्च महिन्याच्या सुरुवातीला, केंद्र सरकारने अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित केल्याबद्दल 19 वेबसाइट्स, 10 अॅप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल्सवर बंदी घातली होती. सॉफ्ट पॉर्न कंटेंटवर कठोर कारवाई करत, केंद्र सरकारने उल्लू अ‍ॅप, एएलटीटी, डेसिफ्लिक्स आणि बिग शॉट्स सारख्या अनेक अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. सरकारने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेंतर्गत इंटरनेट सेवा प्रदात्यांना देशभरात अशा सॉफ्ट पॉर्न कंटेंट दाखवणाऱ्या 25 वेबसाइट्स तात्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्लॅटफॉर्म आयटी नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. हे प्लॅटफॉर्म नियमांचे उल्लंघन करून अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित करत होते, त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला अनेक तक्रारी आल्या होत्या की, हे अ‍ॅप्स कामुक वेब सिरीजच्या नावाखाली प्रौढांसाठी कंटेंट सादर करत आहेत.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाही मंत्रालयाने अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर पसरवल्याबद्दल 19 वेबसाइट्स, 10 अॅप्स आणि 57 सोशल मीडिया हँडलवर बंदी घातली होती.