मध्य रेल्वेच्या राजधानीचा पहिला वाढदिवस साजरा, प्रवाशांचा तुडुंब प्रतिसाद

578

मध्य रेल्वेवर नाशिकमार्गे सुरू झालेल्या राजधानी एक्प्रेसचा पहिला वाढदिवस रविवारी दणक्यात साजरा करण्यात आला. या एक्प्रेसला प्रवाशांचा तुडुंब प्रतिसाद मिळत असून सध्या आठवडय़ातून चार वेळा धावणारी ही गाडी आठवडय़ातून सहा दिवस जरी धावली तरी ती तुफान चालेल असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

मध्य रेल्वेवर गेल्या वर्षी 19 जानेवारीला पहिल्या राजधानी एक्प्रेसला सुरुवात करण्यात आली. या राजधानीचा प्रवास नाशिकमार्गे होत असून ती महाराष्ट्राच्या अनेक भागांतून जात असल्याने तिचा फायदा होत आहे. तसेच कल्याणहूनदेखील या राजधानीला बसणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. या राजधानीने आतापर्यंत 137 फेऱ्या पूर्ण केल्या असून प्रवाशांच्या पसंतीस ती उतरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या