मध्य रेल्वेची लॉकडाऊनमध्ये 1.08 लाख वॅगन्सद्वारे मालवाहतूक

मध्य रेल्वेने कोरोनाचे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मालगाड्या व पार्सल गाड्यांची वाहतूक करीत जीवनावश्यक वस्तूंचा देशभरात सुरळीत ठेवण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. 23 मार्च 2020 पासून मध्य रेल्वेने 2.74 लाख वॅगन्समधून 14.42 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे. मजुरांची आणि वाहतुकीच्या सुविधांची मर्यादित असतानाही मध्य रेल्वेने हे कार्य केले आहे.

मध्य रेल्वेच्या एकट्या मुंबई डिव्हीजनने 1,07,993 वॅगन्सची (वाघीणी )मालवाहतूक केली आली. ज्यामध्ये 74,585 कंटेनर वॅगन्स वापरले आहेत. खतांसाठी 11,066 वॅगन्स, पेट्रोलियम आणि तेल उत्पादनांचे 8463 वॅगन्स, लोह व स्टीलचे 5969 वॅगन्स, कोळशाचे 4484 वॅगन्स आणि इतर वस्तूंच्या 3425 वॅगन्सचा समावेश असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

‘परे’ची 3.79 कोटी लिटर दूधाची वाहतूक

पश्चिम रेल्वेने लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मालगाडीद्वारे 3.79 कोटी लिटर दूधाची वाहतूक गुजरातच्या पालनपूर येथून हिंद टर्मिनल हरियाणाच्या पलवालपर्यंत करीत नवा विक्रम केला आहे. 882 रेल्वे मिल्क टँकरद्वारे 51 मालगाड्यांच्या सहाय्याने ही वाहतूक करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये इतक्या दूधाची वाहतूक करणारी पश्चिम रेल्वे देशातील पहिली झोनल रेल्वे ठरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या