
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात शनिवार-रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असेल.
भायखळा – माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर (मध्यरात्री ते सकाळ) अप जलद मार्गावर दि. 23.7.2022 च्या रात्री 11.30 पासून दि. 24.7.2022 च्या पहाटे 4.05 पर्यंत तर
दि. 24.7.2022 रोजी मध्यरात्री 12.40 ते पहाटे 5.40 पर्यंत डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
उपनगरीय गाड्यांचे डायवर्झन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. 24.7.2022 रोजी सकाळी 5.20 वाजता सुटणारी डाउन जलद मार्गावरील सेवा भायखळा आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
ठाणे येथून दि. 23.7.2022 रोजी रात्री 10.58 आणि रात्री 11.15 वाजता सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यांनुसार थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायवर्शन
ट्रेन क्रमांक 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे दुहेरी थांबा देण्यात येईल आणि 10 ते 15 मिनिटे उशिराने सोडण्यात येईल.
गाडी क्रमांक 11058 अमृतसर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 11020 कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. या गाडीला दादर, प्लॅटफॉर्म क्रमांक 3 येथे दुहेरी थांबा दिला जाईल आणि गंतव्यस्थानी 10 ते 15 मिनिटे उशीरा पोहोचेल.
पनवेल – वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर – खारकोपर BSU मार्गा व्यतिरिक्त)
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून 10.01 पासून दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरीता सुटणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी सेक्शन मध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.
























































