चाकूचा वार करून वृध्दास लुटले, मोबाईल आणि रोख रक्कम असा ऐवज पळवला

घरात घुसून चाकूचा वार करून 78 वर्षाच्या वृध्दाजवळील रोख 9 हजार रुपये, दोन मोबाईल असा 13 हजाराचा ऐवज पळवण्यात आला. या प्रकरणी एकाविरुध्द चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मन्मथ काशीनाथअप्पा शेटे (वय – 78 रा. चाकूर) यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने बालाजी साळुंके यांना शेत बटईने करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून दिलेले आहे. रात्रीच्या सुमारास बटईदाराचा मुलगा प्रविण बालाजी साळुंके हा अचानक आला आणि त्याने चाकू गळ्याला लावला.

चाकूने गळ्यावर आणि पोटावर वार केले. यानंतर फिर्यादी व त्याच्या पत्नीचा असे दोन मोबाईल आणि पाकीटातील रोख 9 हजार रुपये घेऊन फरार झाला. या प्रकरणी चाकूर पोलिसांनी प्रविण बालाजी साळुंकेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या