भाजपकडून आता झारखंडमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) पक्ष सोडतील आणि भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. पण हेमंत सोरेन यांची जामिनावर सुटका झाल्याने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चंपई यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्याने ते नाराज असल्याचे समजते.