पोलिसांची दडपशाही, लोहारडोंगरी’ खाण प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या बंडू धोतरे यांना जबरदस्ती नेले रुग्णालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात होणारे मृत्यू आणि ताडोबाच्या महत्त्वपूर्ण वन्यजीव कॉरिडोरला धोका निर्माण करणाऱ्या ‘लोहारडोंगरी’ खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. या सत्याग्रहाच्या पाचव्या दिवशी पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बंडू धोतरे यांना मध्यरात्री ताब्यात घेऊन जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले. आपली प्रकृती ठीक असतानाही पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात नेल्याचा आरोप यावेळी धोत्रे यांनी केला.