
तेंदु संकलनासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केला. पत्नीचा मृतदेह सापडला असून पती बेपत्ता. ही दुदैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात येणाऱ्या केवाडा येथे घडली. मीना जांभुळकर असे मृतक महिलेचे नाव आहे. विकास जाभुळकर हा बेपत्ता आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्षाने टोकं गाठलं आहे. वन्यजीवांचे हल्ले वाढले आहेत. त्यात तेंदु संकलन सूरू असलेल्या तेंदुची पाणे तोडायला मोठ्या प्रमाणात मजूर जंगलता जात आहे. तेंदु हंगामा दरम्यान वाघाचा हल्याचा घटनेत मोठी वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात येणाऱ्या केवाडा येथिल विकास जाभुळकर आणि त्यांचा पत्नी मिना जाभुळकर तेंदु संकलनासाठी जंगलात गेले. तेंदु संकलन करीत असताना वाघाने हल्ला केला. या हल्यात मिना जाभुळकर यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. तर विकास जाभुळकर हा बेपत्ता आहे. घटनेची माहीती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग शोध घेत आहे.

























































