चंद्रपूरमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात कीटकनाश औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. धर्माजी किसन करमणकर (६४)असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं परिसरात बोललं जातं आहे. धर्माजी करमणकर हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्या नावे तीन एकर शेती आहे. त्यांच्यावर बँक आफ इंडियाचे मागील वर्षातील पन्नास हजार रुपये पीक कर्ज थकीत आहे. मागील वर्षी झालेली नापिकी त्यात पीक कर्ज त्यांना मिळाले नव्हते. मागील काही दिवसापासून ते मानसिक तणावात होते. रविवारला शेतात असलेले कीटकनाशक औषध प्राषण करून त्यांनी आयुष्य संपविले.