
चंद्रपूर शहरातील बायपास रोडवरील जुनोना चौक परिसरात बंदुकीने गोळी मारून एका तरुणाने त्याच्या मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडली. घरगुती कारणावरून हत्या करण्यात आली. मृतकाचे नाव बुद्धा सिंह टाक(45) आहे. तर आरोपीचे नाव सोनू सिंह टाक (30) आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. आरोपी सोनू सिंग घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

























































