
आजपासून राज्यातील वीज कर्मचारी दोन दिवसीय संपावर गेले आहेत. केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कर्मचारी विद्युत संशोधन कायदा 2021 चा कडाडून विरोध करत आहेत. राज्यातील जलविद्युत केंद्रे खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी देण्याचा विरोध करण्यात आलाय. प्रथमच नियमित वीज व कंत्राटी कर्मचारी एकत्र संपावर गेले आहेत. यामुळे राज्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. चंद्रपुरात सकाळपासून द्वारसभेच्या माध्यमातून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.
























































