
चंद्रपूर शहरातील वन्यजीव शुश्रुषा केंद्र म्हणजे transit treatment center च्या परिसरात 13.5 फुटांचा विशालकाय अजगर आढळून आला आहे. वन्यजीव शुश्रुषा केंद्र परिसरात कर्मचाऱ्यांची वसाहत आहे.
या वसाहतीच्या मागेच हा अजगर वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला दिसून आला. या भागातील मोकाट कुत्र्याची शिकार केल्यामुळे हा अजगर सुस्त पडला होता. शुश्रुषा केंद्रातील कर्मचारी आणि वसाहत परिसरातील त्यांच्या परिवारातील सदस्यांना भविष्यात धोका उत्पन्न होऊ नये, म्हणून या अजगराला पकडून जवळच्याच जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ-

























































