चंद्रपूरमध्ये चोरट्याकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न

चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प चौकात असलेला एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना एटीएम मधील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. बंगाली कॅम्प चौकातील बँक ऑफ इंडियाच एटीएम असून हे ATM फोडण्याचा अज्ञात व्यक्ती कडून दुसऱ्यांदा प्रयत्न झाला. या आधी ही इथे घटना घडली होती.

सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता पांढरा शर्ट आणि डोक्याला कपडा गुंडाळलेला व्यक्ती एटीएममध्ये घुसून एटीम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. बँकेने एकाही एटीएममध्ये सुरक्षा रक्षक ठेवलेले नाही आहेत. शहरातील सर्व एटीएमची सुरक्षा रामभरोसे आहेत. सतत होत असलेल्या घटनेमुळे पोलिसांची रात्रीची गस्त वाढविण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्या अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.