
चंद्रपुरात वाघ नागरिकांवर चाल करून आल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. यामुळे लोकांची पाचावर धारण बसली.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात सध्या दोनहुन अधिक वाघांचं वास्तव्य आहे. हेच वाघ शहराच्या इरई नदी काठावर सातत्याने दर्शन देत होते. सध्या या वाघांनी आपली दिशा बदलून पुन्हा वीज केंद्र जंगलात ठाण मांडलं आहे. यापैकीच एक वाघ रस्त्याच्या कडेला असताना काही तरुण त्याला बघत होते.
तरुण व्हिडीओ काढत असताना एका क्षणी वाघानं युवकांवर चाल केली. मात्र क्षणभरात वाघ शांत होत परतल्याने धोका टळला. याच मार्गावर अन्य वाहनधारकांनी देखील हा जीवघेणा थरार अनुभवला. सध्या हा व्हिडिओ वायरल झाला असून काळजी न घेतल्यास मानव-वन्यजीव संघर्षाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




























































