
चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यातील भादूरना-सोमनाथ जंगलात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी तेंदूपाने संकलन करण्यासाठी जंगलात गेला होता. खुशाल सोनूले (54) असे मृताचे नाव आहे.
संध्याकाळपर्यंत तो घरी परत न आल्याने घरच्यांनी वनविभागाला सूचना देण्यात आली होती. मग आज सकाळी ग्रामस्थ, वनविभाग, पोलीस यांनी मोहीम राबवत जंगलात शोध घेत असताना छिन्न-विच्छिन्न अवस्थेत मृतदेह सापडला.
मयत खुशाल याच्या पश्चात पत्नी व 2 मुले असा परिवार आहे. वनविभागाने मृतकाच्या वारसांना 25 हजार रुपयांची प्राथमिक मदत दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन दिवसातील दुसरी घटना आहे.
























































