चंद्रपूरमध्ये गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळला

528

चंद्रपूर शहराला लागून असलेल्या जुनोना गावात गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, गावकऱयांच्या सतर्कतेने हा प्रयत्न उधळून लावण्यात आला. ग्रामस्थांनी पूजेचे साहित्य, मांत्रिक यांच्यासह अनेकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

गावालाच लागून हिवरे नावाच्या व्यक्तीचे शेत आहे. या शेतात असलेल्या घरात काही लोकांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. गावातील काही सतर्क लोकांनी तिथे जाऊन कानोसा घेतल्यावर आतून विचित्र अशा मंत्रोच्चारांचा आवाज येत होता. थोडय़ा वेळात आत असलेल्या मांत्रिकाकडून नरबळीचादेखील उल्लेख झाला. सतर्क नागरिकांनी तात्काळ घरात प्रवेश करत मांत्रिकासह एक महिला, लहान मूल आणि आणखी तिघा व्यक्तींना ताब्यात घेतले. यात पोलीस पाटील जयपाल औरासेचे वडील नथू औरासे यांचासुद्धा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या