
गोंडपिपरी तालुक्यातील राजकीय आखाड्यात अनेक रंजक घटना घडल्या. दोन सख्या जावांमध्ये काट्याची लढत झाली. या घटनांनी मतदाराचे चांगलेच मनोरंजन केले. आता निकाल जाहीर झाला. या निकालात एका उमेदवार चक्क शून्य मतदान मिळाले. या उमेदवाराने स्वत:च मतही स्वत:ला दिलं नाही. भाजपाचा कार्यकर्ता असलेल्या या उमेदवाराने बंडखोरी केली होती. मात्र वरिष्ठांनी समजूत काढल्याने उमेदवाराने स्वत:चा प्रचार केला नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात सहा नगर पंचायतीचा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत गोंडपिपरी शहरात घडलेल्या मनोरंजक घटनांनी जिल्हाचे लक्ष वेधले. तालुक्यात दोन सख्या जावा एकमेकांच्या विरोधात उभ्या झाल्या होत्या. तर कार्यकर्त्यांना मटणाची मेजवानी देणाऱ्या उमेदवाराची सात किलो मटण विरोधकांनी लंपास केलं. या घटनांनी मतदारांचे चांगलेच मनोरंजन केलं. आता निकाल जाहीर झाले आहेत. आलेल्या निकालात एका उमेदवाराला शुन्य मतदान मिळालं. या उमेदवाराने स्वत:चं मत स्वत:लाच दिलं नाही. जितेंद्र इटेकर असं उमेदवाराच नाव आहे. वार्ड नंबर दोन मधून एससी प्रवर्गातून इटेकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. इटेकर भाजपचे कार्यकर्ता आहेत. त्यांनी पक्षाला उमेदवारी मागितली मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्याने इटेकर अपक्ष म्हणून राजकीय रिंगणात उतरले. मात्र पक्षातील पदाधिकाऱ्यांनी समजूत काढल्याने त्यांनी स्वत:चा प्रचार केला नाही. स्वत:चे मतही स्वत:ला दिले नाही. मात्र शून्य मतदान मिळवणारे इटेकर जिल्ह्यातील पहिले उमेदवार ठरले आहेत.


































































