तू माझ्या आयुष्याची पहाट – चंद्रशेखर पाटील

200

आपला जोडीदारमीना चंद्रशेखर पाटील

लग्नाचा वाढदिवस१६ मे १९७९

त्यांचे दोन शब्दात कौतुकशांत समजुतदार गृहिणी.

आठवणीतला क्षणतिच्या सख्ख्या बहिणीचे लग्न असतानाही लग्न लागताच माझ्या वृद्ध आईच्या काळजीने लगेच घरी आली तो क्षण मी कधीही विसरणार नाही.

त्यांचा आवडता पदार्थसमोसा

स्वभावाचे वैशिष्टय़अतिशय कष्टाळू, सुशील.

एखादा त्यांच्याच हातचा पदार्थउकडीचे मोदक, बिरडय़ाची भाजी करावी तर तिनेच…

वैतागतात तेव्हा मी शांत राहतो, ती शांत झाली की तिच चहा आणून देते.

त्यांच्यातली कलातिच्या दिवसाची सुरुवात पहाटे रेडिओवर मंगल प्रभात मराठी कार्यक्रम ऐकून होते.

त्यांच्यासाठी एखादी गाण्याची ओळ‘अधिकार’ या चित्रपटातील ‘मै दिल तू धडकन तुझसे मेरा जीवन, कांच के जैसा टूट जाऊंगा मै.. टुटा जो ये बंधन…

भूतकाळात जगायचे असल्यास कोणता दिवस जगाल मुलगा सनी डॉक्टर झाला तो दिवस.

तुमच्यातील सारखेपणाती मला फार जपते हा तिचा मोठेपणा भावला. आम्ही एकमेकांना जपतो.

तुम्हाला जोडणारा भावबंधआमची मुलं राजश्री, दिनेश, सनी आणि आता नातवंड.

विश्वास म्हणजेमीना… आईनंतर तिच्यावरच आहे.

आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट१९८१ मध्ये गिरणी संपानंतर कुटुंबाची वाताहत झाली, मी मुंबईत नोकरीच्या शोधात, त्यामुळे माझ्या वृद्ध आई बाबांसोबत तुला मुलांसोबत २२ वर्षे गावीच राहावं लागलं. तिथेही तुझे परिश्रम आणि मुलांवर चांगले संस्कार घडल्यामुळेच आपली तिन्ही मुले राजश्री शिक्षिका, दिनेश बँकेत तर सनी डॉक्टरीपर्यंत पोहोचला. तुझी साथ अशीच लाभो.

आपली प्रतिक्रिया द्या