Chandrayaan-2 चंद्राच्या कक्षेमध्ये हिंदुस्थान-चीन आमनेसामने, वाचा सविस्तर…

12623

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापासून अवघ्या 2.1 किलोमीटर असताना संपर्क तुटलेल्या विक्रम लॅण्डरशी संपर्क साधण्याचा इस्त्रोकडून प्रयत्न सुरु आहे. इस्त्रोसह नासाही विक्रमला संदेश पाठवून त्याच्याची संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. अद्याप संपर्क झालेला नाही. परंतु इस्त्रोच्या चांद्रयान-2 मोहीमेचे जगभरात कौतुक सुरू आहे. चीनने देखील हिंदुस्थानचे कौतुक केले होते. आता पुन्हा एकदा याच संबंधी चीनचे नाव आले असून चंद्रावर हिंदुस्थान-चीनचा सामना झाला आहे.

Chandrayaan-2 ‘विक्रम’च्या संपर्कासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे, ‘LRO’वर सर्वांची नजर

चंद्राच्या कक्षेमध्ये हिंदुस्थान आणि चीनचा सामना अरुणाचल प्रदेश आणि लडाखच्या सीमेवर होतो तसा झालेला नाही. हिंदुस्थानच्या महत्त्वाकांशी योजनापैकी एक असणाऱ्या चांद्रयान-2 (Chandrayaan-2) ऑर्बिटरची आणि चीनचा ऑर्बिटर क्यूकियाओची सामना झाला. हे दोन्ही ऑर्बिटर समोरासमोर आले होते. चीनने 20 मे, 2018 रोजी आपल्या मून मिशन चांगई-4 द्वारे हा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत पाठवला होता.

चीनचा चांगई-4 चा लॅण्डर आणि रोव्हर चंद्रावर 7 डिसेंबर, 2018 ला लॅण्ड झाला होता. सध्या हे दोघेही चंद्रावर कार्यरत आहेत. तर ऑर्बिटर क्यूकियाओ चंद्राभोवती चक्कर मारत आहे. हिंदुस्थानच्या चांद्रयान-2 चे ऑर्बिटरचे जे काम आहे तेच काम क्यूकियाओही करतो. चंद्राचे फोटो आणि वातावरणाची माहिती पृथ्वीवर पाठवण्याचे काम ऑर्बिटर करतो.

खगोलतज्ज्ञ स्कॉट टायली याने 12 सप्टेंबरला एक ट्वीट केले होते. यात त्याने चांद्रयान-2 चे ऑर्बिटर आणि चीनचे क्यूकियाओ हे आमनेसामने आलो होते. दोघे जवळपास 12 मिनिटं समोरासमोर होते. यानंतर दोघांनी पुन्हा आपल्या कक्षेमध्ये फिरण्यास सुरुवात केली.

आपली प्रतिक्रिया द्या