खूशखबर मिळणार? विक्रमच्या लँडिंग साईटवरून नासाचे ऑर्बिटर जाणार

1314

इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पडलेला लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क करण्याचे इस्त्रोसह (Indian Space Research Organisation – ISRO) अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ (NASA) प्रयत्न करत आहे. विक्रमशी संपर्क साधण्यासाठी आज मंगळवारचा दिवस महत्त्वाचा आहे. नासाचे लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटर (LRO) विक्रमच्या लँडिंग साईटवरून जाणार आहे. त्यामुळे येत्या काही तासांत खूशखबर मिळण्याची शक्यता अधिक आहे.

Chandrayaan-2 चंद्राच्या कक्षेमध्ये हिंदुस्थान-चीन आमनेसामने, वाचा सविस्तर…

नासाचे ऑर्बिटर मंगळवारी विक्रमच्या लँडिंग साईटवरून जाणार आहे. नासाच्या या ऑर्बिटरने चंद्रावर मानवी पाऊल पडल्याच्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अपोलो 11 ज्या जागी उतरले होते, त्याचे फोटो पाठवले होते. नासाने पाठवलेले फोटो खूप स्पष्ट होते. त्यामुळे विक्रम लँडरचे फोटोही नासाच्या ऑर्बिटर मिळण्याची आशा आहे.

vikram-lander

नासाच्या लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटर (LRO) प्रोजेक्टचे संशोधक नोआ. ई. पेत्रो म्हणाले की, चंद्रावर आता अंधार (सायंकाळ) होऊ लागला आहे. आमचे LRO विक्रम लँडरचे फोटो घेईल, मात्र ते किती स्पष्ट येतील हे माहिती नाही. कारण सायंकाळी सूर्याचा प्रकाश कमी होतो, त्यामुळे चंद्रावरील वस्तूंचा फोटो घेणे आव्हानात्मक असणार आहे. परंतु जे काही फोटो येतील ते आम्ही इस्त्रोसोबत शेअर करू, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या