पुढील वर्षीचांद्रयान 3 झेपावणार

524

चांद्रयान 3 च्या लॉचिंगला थोडा विलंब झाला असून पुढील वर्षी म्हणजेच 2021च्या पहिल्या सहा महिन्यांत चांद्रयान अवकाशात झेपावेल, असे संकेत केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतेवेळी दिले. चांद्रयान 2च्या अपयशानंतर इस्रोने वर्ष 2020च्या अखेरीस चांद्रयान-3 लॉन्च करण्याची घोषणा केली होती. चांद्रयान 2चे डिझाईन, क्षमता लक्षात ठेवून चांद्रयान 3ची तयारी करीत असल्याचे इस्रोने म्हटले होते. चांद्रयान 2 मधून धडा घेत चांद्रयान 3मध्ये काही बदल केल्यानंतरच उड्डाणाला परवानगी देणार असल्याचे केंद्रीय मंत्री सिंग यांनी स्पष्ट केले.

चांद्रयान 3 साठी समिती

चांद्रयान 3 च्या तयारीसाठी इस्रोने एक समिती स्थापन केली असून या समितीचे नेतृत्व थिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे संचालक एस. सोमनाथ करीत आहेत. चांद्रयान 3शी संबंधित सर्व रिपोर्ट ही समिती तयार करीत आहे.

‘मिशन गगनयान’साठी संशोधन सुरू

हिंदुस्थानच्या मानवरहित अंतराळ मिशन गगनयानसाठी संशोधन सुरू असून या प्रोजेक्टसाठी मायक्रोग्रॅव्हिटीसंबंधित 4 बायोलॉजिकल आणि भौतिक विज्ञानसंबंधी संशोधन सुरू असल्याची माहितीही यावेळी सिंग यांनी दिली. तसेच चार अंतराळवीरांचे स्पेस फ्लाईट ट्रेनिंग सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या