
इस्रोचे बहुचर्चित चांद्रयान योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरपासून सोमवारी वेगळा झालेला किक्रम लँडर चंद्राच्या आणखी जवळ पोहोचला आहे. 7 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1.55 च्या सुमारास किक्रम लँडर चंद्राकर उतरेल. चांद्रयान 2 च्या लँडर विक्रमने चार सेकंदांत उलट्या दिशेने चालण्याची नियोजित प्रक्रिया पूर्ण केली. आज सकाळी 8.50 वाजता या प्रक्रियेला यशस्वीरित्या सुरुवात झाली होती. स्कदेशी बनाकटीच्या या लँडरमधील प्रोप्लशन सिस्टिम पहिल्यांदाच प्रज्वलित करण्यात आली. चाल बदलण्याची प्रक्रिया उद्या दुपारी 3.30 ते 4.30 या वेळेत पूर्ण होईल.
प्रग्यान हा सहा चाकी रोव्हर असून सध्या तो विक्रम लँडरमध्ये आहे. प्रग्यान रोव्हर चंद्राचा पृष्ठभाग, पाणी, खड्डे यासंबंधीची माहिती इस्रोला पाठवेल. यातून चंद्राबद्दल अज्ञात असलेल्या अनेक गोष्टींची उकल होऊ शकते. लँडिंगच्याकेळी शास्त्रज्ञांसमोर चंद्रावरच्या धुळीचे आव्हान असेल. इस्रो पहिल्यांदाच अशा प्रकारे चंद्रावर लँडिंग करणार आहे.
का बदलली चाल
विक्रमला एक मध्यवर्ती इंजिन आणि तीन सहाय्यक इंजिन लावलेले आहेत. विक्रमने चाल बदलल्याने त्याच्या एका बाजूचे अल्टिट्यूड 100/100 ने कमी होऊन 100/35 होईल. विक्रमच्या एका भागाचे अल्टिट्यूड जास्त तर दुसर्या भागाचे कमी होईल. त्याला चंद्रावर उतरणे सोपे जाईल.


























































