
आज राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू होती. गृहमंत्री अमित शहा यांचं भाषण सुरू होतं. पंतप्रधान मोदींनी स्वतः येऊन सर्व मुद्द्यांवर उत्तरे द्यावीत, अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे उपसभापतींवर संतापले आणि म्हणाले की, आम्ही येथे फिरायला आलोय का?
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, जर पंतप्रधान स्वतः सभागृहात येऊन उत्तर देत नसतील तर ते सभागृहाचा अपमान आहे. यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला.
विरोधी पक्षांनी म्हटलं की, पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण केलं, मग ते राज्यसभेत का याबाबत उत्तर द्यायला का नाही येऊ शकत? यानंतर सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळालं. याचदरम्यान, सरकारविरोधात घोषणाबाजी करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला.