
चारधाम यात्रा 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. यात्रेकरिता भाविकांनी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात केली आहे. यात्रेच्या ऑनलाईन नोंदणीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून फक्त 12 दिवसांत 7 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी नोंदणी असून केली आहे. 2025 मध्ये 51 लाख भाविकांनी नोंदणी करून नवा विक्रम केला होता. या वर्षी तो विक्रम मोडला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
19 एप्रिलला यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरांचे दरवाजे उघडणार आहेत. त्यानंतर 22 एप्रिलला केदारनाथ धाम, 23 एप्रिलला बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आणि 23 मे रोजी शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या हेमकुंड साहिबचे दरवाजे खुले होणार आहेत. या चारधाम यात्रेच्या दर्शनासाठी पर्यटन विभागाने 6 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.
ऑफलाईन नोंदणी 17 एप्रिलला
यात्रा सुव्यवस्थित करण्यासाठी राज्य सरकारने 70 टक्के ऑनलाईन आणि 30 टक्के ऑफलाईन नोंदणीचा कोटा निश्चित केला आहे. ऑफलाईन नोंदणी 17 एप्रिलपासून सुरू होईल. हरिद्वार, ऋषिकेश, नयागाव आणि हर्बर्टपूर ही मुख्य केंद्रे असतील. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि भाविकांच्या लांब रांगा टाळण्यासाठी प्रशासनाने या वेळी केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे.



























































