
उत्तराखंडमधील चारधाम यात्रा 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे, परंतु त्याआधीच बुकिंगला कमी प्रतिसाद मिळत असल्याने हॉटेल व्यावसायिक चिंतेत आहेत. देशभरात सुरू असलेल्या इंधन तुटवडीचा फटका आता हॉटेल आणि वाहनांच्या बुकिंगमध्ये दिसत असून बुकिंगमध्ये 50 ते 80 टक्क्यांपर्यंत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. चारधाम यात्रा करणाऱया भाविकांमध्ये अनेक जण हे स्वतःचे जेवण बनवतात. बऱ्याचदा ते व्यावसायिक सिलिंडर सोबत आणतात.




























































