ChatGPT जगभरात ठप्प; युजर्स करतायत अडचणींचा, सोशल मीडियावर तक्रारींचा पूर

ओपनएआयच्या एआय चॅटबॉट चॅटजीपीटी (ChatGPT) मंगळवारी ठप्प झाल्याने हिंदुस्थानसह जगभरातील युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. वेब आणि मोबाइल अॅपवर चॅटजीपीटी वापरताना युजर्सना एरर मेसेज दिसत आहे. डाउनडिटेक्टर या वेबसाइटनुसार, हिंदुस्थानात दुपारी 12 वाजल्यापासून या समस्येची सुरुवात झाली.

हिंदुस्थान आणि अमेरिकेत सर्वाधिक तक्रारी

डाउनडिटेक्टरच्या अहवालानुसार, हिंदुस्थानात 88 टक्के युजर्सना चॅटजीपीटीच्या वेब अॅपवर समस्या आल्या, तर 9 टक्के युजर्सना मोबाईल अॅपवर अडचणी जाणवल्या. तसेच 3 टक्के युजर्सना चॅटजीपीटीच्या एपीआयमध्येही अडथळे आले. अमेरिकेत 93 टक्के युजर्सना चॅटजीपीटीच्या मुख्य कार्यप्रणालीत अडचणी आल्या, तर 7 टक्के युजर्सना अॅप आणि 1 टक्के युजर्सना एपीआयशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला. दरम्यान, चॅटजीपीटी ठप्प झाल्याने अनेक युजर्सनी एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या तक्रारी व्यक्त करत आहेत.