‘मॉर्फ’ व्हिडीओवर छत्रपती संभाजीराजे संतापले, तत्काळ कारवाईची मागणी

1298

छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत संताप व्यक्त केला आहे. ‘पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीं तर नरवीर तानाजी मालुसरे यांचा चेहरा मॉर्फ करून एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवरून व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे देशभरातील तमाम शिवप्रेमी संतापले आहेत. या व्हिडीओवर महाराष्ट्रासह देशभराती नेटकऱ्यांनी भाजपविरोधात संताप व्यक्त केला आहे.

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनिय तसेच निंदनीय.संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी.

अभिनेता अजय देवगण आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट बॉक्सस ऑफिसवर जबरदस्ध्यात कामगिरी करत आहे. या चित्रपटातील काही प्रसंग निवडत त्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे तर तानाजी मालुसरेंच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. विधासभा निवडणुकीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. या पार्श्वभूमीवर पॉलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ प्रसारीत करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या