300 रुपयात दिवसाला 4 जीबी डेटा आणि फ्री कॉलिंग, हे आहेत विशेष प्लॅन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी काही विशेश प्लॅन आणले आहेत. हे प्लॅन फक्त स्वस्त नसून त्यात अनेक फायदे आहेत.  300 रुपयांपेक्षा  कमी असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना जास्त डेटा मिळणारच आहे, शिवाय फ्री कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे.

व्होडाफोन आयडियाचा 299 च्या प्लॅन

व्होडाफोन आयडियाचा एक प्लॅन आहे. ज्यात विकेंड डेटा रोलओवर आणि डबल डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून ग्राहकांना दिवसाला 4 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग असून दिवसाला 100 मोफत एसएमएसही आहेत.

एअरटेलचा 298चा प्लान

एअरटेलचा 300 रुपयांपर्यंत चांगला असलेला प्लॅन म्हणजेच 298 रुपयांचा. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला 2 जीबी डेटा मिळणार आहे. त्याची वैधता 28 दिवसांची असून अनलिमिटेड कॉल असणार आहे. तसेच 100 एसएमएसही ग्राहकांना मिळणार आहे. इतकेच नाही तर ग्राहकांना एअरटेल एक्स्ट्रिम प्रिमियम आणि विंक म्युझिकचे मोफत सब्स्क्रिप्शनही मिळणार आहे. तसेच या प्लॅनसोबत ग्रहाकांना FASTag विकत घेतल्यावर 150 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

जियोचा 249 चा प्लॅन

जियोचा आपल्या ग्राहकांसाठी 249 रुपयांचा प्लॅन आहे. त्यात ग्राहकांना 2 जीबीचा डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये जियो टू जियो फ्री कॉलिंग असून इतर नेटवर्क्सवर कॉल करण्यासाठी 100 FUP मिनिटे मिळतात. तसेच जियोच्या ऍप्सही मोफत मिळतात.