अभिनेता आर्यन कार्तिकसोबत मीटिंग आणि चित्रपट निर्मिती करतो असे सांगून महिलेची 87 लाख रुपयांची फसवणूकप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी कृष्णाकुमार शर्माला अंबोली पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार या महिला असून त्या अंधेरी परिसरात राहतात. काही महिन्यांपूर्वी एक जण त्यांना भेटला होता. त्याने अभिनेता आर्यन कार्तिकसोबत मीटिंग करून देतो असे सांगितले होते. तसेच चित्रपट निर्मिती करून देतो असे त्यांना सांगण्यात आले. तक्रारदार याने एकाला आर्यन कार्तिकसोबत आगामी चित्रपटाच्या निर्मितीबाबत विचारणा केली. त्याने आर्यन कार्तिकसोबत मीटिंग करून दिली नाही. पैशाबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला.