
मुंबई गुन्हे शाखा युनीट-7 च्या पथकाने चेंबूर येथील दोन पान शॉपवर छापेमारी करून लाखो रुपये किंमतीचा ई-सिगारेटचा साठा हस्तगत करण्यात आला. तर बंदी असतानाही ई-सिगारेट विकणाऱया तिघांना पोलिसांनी अटक केली.
चेंबूर येथील मैत्री पार्क परिसरात असलेल्या जय महाराष्ट्र आणि महालक्ष्मी पान शॉपमध्ये बंदी असलेले व आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या ई-सिगारेटची विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार युनीट-7 चे प्रभारी निरीक्षक सुधीर जाधव तसेच सपोनि अमोघसिद्ध ओलेकर,उपनिरीक्षक रामदास कदम, स्वप्निल काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर व पथकाने त्या दोन्ही पान शॉपवर छापे टाकले. त्यावेळी त्या पान शॉपमध्ये परदेशी बनावटीची 89 प्रतिबंधित ई सिगारेट मिळून आले. याप्रकरणी पोलिसांनी शुभम चौरसिया, करण चौरसिया आणि छेदिलाल गुप्ता अशा तिघांना अटक केली.






























































