
हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचे रविवारी कोरानाने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरूग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
चेतन चौहान यांनी 1969 ते 1981 या कालावधीत 40 कसोटी व सात वन डे सामन्यांत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दोनवेळा ते खासदार होते आणि सध्या ते उत्तर प्रदेशमध्ये सैनिक कल्याणमंत्री होते.

























































