
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाला विलंब होत असून अजूनही व्हीएसआर कंपनीच्या मालकावर कारवाई झालेली नाही. व्हीएसआर कंपनीविषयी तक्रारी असूनही कंपनीवर सरकार मेहरबान का? या कंपनीला अद्याप काळ्या यादीत का टाकले नाही असे सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे यांनी आज केला. अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप केला.
अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी विधानसभेत नियम 293 अन्वये चर्चा उपस्थित केली आहे. या चर्चेत सहभागी होताना चेतन तुपे यांनी मुंबईत सकाळी साडेसात वाजेपर्यंत रस्त्यावर कुठेही वाहतूक कोंडी नसते. मग अशा वेळी नियोजित वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला म्हणून ऐन वेळी विमानाचा पायलट आणि क्रू का बदलण्यात आला? ऐन वेळी पायलट बदलणे हे संशयास्पद आहे. विमानात पुरेसे इंधन होते तर मग विमान पुण्याच्या विमानतळावर का नेले? असे प्रश्न करत व्हीआरएस कंपनीचे मालक आणि वैमानिकाची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली.




























































