ना विराट, ना स्मिथ; पाकिस्तानचा हा खेळाडू खेळतो सर्वोत्तम स्पिन, चेतेश्वर पुजारा स्पष्टच बोलला

कसोटी हा क्रिकेटचा आत्मा आहे. क्रिकेटची सुरुवातही याच प्रकाराने झाली होती. आज झटपट क्रिकेटची चलती असून कसोटीत मैदानावर पाय रोवून उभे राहणारे फलंदाज कमीच आढळतात. त्यातल्या त्यात आशियाई खेळपट्टीवर फिरकीचा यशस्वीपणे सामना करत धावांची रास रचणारे बोटावर मोजता इतकेच खेळाडू आहेत. चेतेश्वर पुजारा हा त्यापैकीच एक.

मधल्या फळीत फलंदाजीला येऊन गोलंदाजांची पिसे काढण्यात पुजारा माहीर. त्यातल्या त्यात फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यात त्याला विशेष कौशल्य आहे. पुजाराने अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत मैदानात उभे राहून संघाला सामना जिंकून दिला आहे. तसेच सामना अनिर्णीत राखण्यात मोलाचे योगदान दिले आहे. याच पुजाराने आपल्याहून अधिक चांगल्या प्रकारे फिरकी खेळणाऱ्या खेळाडूचे नाव सांगितले आहे.

फिरकीचा सामना तुझ्याहून अधिक चांगल्या प्रकारे कोण करते असे विचारले असता पुजाराने जे उत्तर दिले ते ऐकून सगळेच अवाक झाले. त्याच्या समोर मुशफिकुर रहीम, डेव्हिड वॉर्नर, डीन एल्गार, रोहित शर्मा, रॉस टेलर, जॉनी बेअरस्टो, एबी डिव्हिलियर्स, रॉस टेलर यांचेही नाव घेण्यात आले. यावर पुजाराने काही प्रतिक्रिया दिली नाही. नंतर वर्तमानातील सर्वात यशस्वी खेळाडू जो रूट याचे नाव घेण्यात आले, त्यावेळी त्याने कदाचित असे उत्तर दिले.

विराट कोहलीचे नाव घेतल्यावर त्याने तो माझ्याच बरोबरीचा असल्याचे म्हटले. आकडे सांगतात की तो फिरकीचा सामना योग्य प्रकारे करतो. स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन हे देखील चांगले खेळाडू आहेत. हिंदुस्थान विरुद्ध त्यांचा विक्रमही चांगला आहे. पण त्यांची तुलना होऊ शकत नाही, असे म्हणत पुजाराने पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे नाव सांगितले.

रो-कोचे मिश्रण म्हणजे शुभमन, जोस बटलरकडून गिलचे काैतुक

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू युनुस खान आपल्याहून चांगल्या पद्धतीने फिरकीचा सामना करतो असे पुजारा म्हणाला. युनुस खान माझ्याहून अधिक उत्तम प्रकारे फिरकी खेळू शकतो, असे तो म्हणाला. युनुस खान याची आकडेवारीही बोलकी असून पाकिस्तानकडून कसोटीत दहा हजारांहून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. 118 कसोटीत त्याने 34 शतकांच्या मदतीने 10099 धावा केल्या आहेत.

BCCI ला मोठा धक्का! द्यावे लागणार 538 कोटी, उच्च न्यायालयाचा निर्णय; काय आहे प्रकरण? वाचा