
अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना आज प्रकृतिअस्वास्थ्यामुळे जसलोक रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. छगन भुजबळ आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयात उपस्थित होते. आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर ट्विट करत कुंभमेळय़ासाठी घेतलेल्या बैठकीबाबतही त्यांनी माहिती दिली होती. छगन भुजबळ यांच्या छातीत दुखत असल्याने डॉक्टरांनी तातडीने त्यांची प्राथमिक तपासणी केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

























































