छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून रस्ते कंत्राटदाराची हत्या, परिसरात शोध मोहिम सुरू

प्रातिनिधिक फोटो

छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी रस्ते कंत्राटाराचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. इम्पियाज अली असे हत्या झालेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. पामेड पोलीस ठाण्याजवळ सुरक्षा छावणीजवळ कंत्राटदाराचा मृतदेह आढळून आला. घटनेनंतर पोलिसांनी परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्पियाज अली याला रस्ते बांधकामाचे कंत्राट देण्यात आले होते. रविवारी संध्याकाळी मेटागुडा सुरक्षा छावणीजवळ माओवादी मिलिशिया सदस्यांच्या एका गटाने अली याला मारहाण करत त्याचे अपहरण केले. अलीच्या सहकाऱ्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी परिसरात शोध मोहिम सुरू केली. या मोहिमेदरम्यान पामेड पोलीस ठाण्याजवळ सुरक्षा छावणीजवळ अलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.