छोटा राजनला करायचा होता दाऊदचा गेम; एजाज लकडावालाने उघड केली अंदर की बात

928

गँगस्टर एजाज लकडावालाने पोलीस तपासात गँगवॉरमधील काही गुपिते उघड केली. डॉन दाऊद इब्राहिम याच्यापासून फारकत घेतल्यानंतर स्वतःची टोळी सुरू करणारा छोटा राजन 1998 मध्ये दाऊदचा गेम करणार होता. कराचीमध्ये आम्ही फिल्डिंग देखील लावली होती, पण तो गेम फसला असे एजाजने चौकशीत सांगितल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.

एजाज लकडावाला एकेकाळी दाऊदसाठी काम करायचा, पण नंतर तो छोटा राजनसोबत काम करू लागला. अलीकडेच त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. एजाज हाती लागल्यामुळे आता गँगवॉरमधील बऱयाच महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होणार आहे. 1998 मध्ये दाऊदचा गेम करायचा कट छोटा राजनने आखला होता. त्यानुसार विकी मल्होत्रा, फरीद तानाशा, बाळू डोकरे, लकडावाला, विनोद मटकर, संजय घाटे आणि बाबा रेड्डी अशी टोळी कराचीमध्ये दाऊदला मारण्यासाठी गेली होती. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर दाऊद तेथील एका दर्ग्यात येणार होता. त्यामुळे विकी मल्होत्रा आणि बाकी सर्व त्या दर्ग्याजवळ फिल्डिंग लावून होतो. पण आम्ही तेथे आलो असल्याची टीप नेपाळच्या एका खासदाराने दिल्यामुळे दाऊद तेव्हा कडक बंदोबस्तात आला होता. त्यामुळे तेव्हा तो वाचला असे लकडावालाने सांगितल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या