
‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या 50 टक्के टॅरिफचा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असे स्पष्ट मत मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केले आहे.
ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ’टॅरिफचा फटका नक्कीच बसेल, आर्थिक वर्ष 2026 मध्ये हिंदुस्थानचा जीडीपी अर्ध्या टक्क्याने घसरेल, असे नागेश्वरन म्हणाले. ट्रम्प यांनी दंड म्हणून लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हा तात्पुरता असेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ’अतिरिक्त टॅरिफ कधीपर्यंत राहील यावर बरेच काही अवलंबून आहे. मात्र, पुढील आर्थिक वर्षातही टॅरिफ बाबतची अनिश्चितता कायम राहिली किंवा त्यात घट दिसली नाही तर तो फटका मोठा असेल. हिंदुस्थानसाठी ती धोक्याची घंटा असेल, असे नागेश्वरन म्हणाले.