
शून्य ते चौदा या वयोगटातील बालकांना कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात झाल्याचे वैद्यकीय विश्लेषणावरून दिसून आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी लोकसभेत शुक्रवारी दिली. मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग मध्यम स्वरूपाचा असून त्यातील बहुतांश मुले लक्षणे नसलेली आहेत, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. या वयोगटातील मुलांमध्ये अत्यंत दुर्मिळ प्रमाणात गंभीर लक्षणे आढळली आहेत. संसर्ग झाल्यानंतर तीन ते सहा महिन्यांनी ही लक्षणे आढळली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अखिल हिंदुस्थानी आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) बालरोग विभागाने बालकांमधील शून्य ते चौदा वयोगटातील बालकांवरील कोरोनाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सरकारने काही कृती आराखडा तयार केला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे कोरोनाकाळात समुपदेशन करण्यासाठी 8448440632 ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.


























































