
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये सुरू झालेले युद्ध आम्ही थांबवले, असा दावा आता चीनने केला आहे. हे युद्ध अमेरिकेने थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प सतत करत आले आहेत. आता त्याचे श्रेय चीनने घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बीजिंगमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिस्थिती व चीनचे परराष्ट्र धोरण यावर बोलताना चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी हा दावा केला. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात सर्वाधिक संघर्ष 2025 या वर्षात झाले. अनेक देशांत अशांतता होती. चीनने विविध देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. म्यानमार, इराणचा अणुकार्यक्रम, हिंदुस्थानचे ऑपरेशन सिंदूर, पॅलेस्टिन-इस्रायल हे संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी केली, असे यी म्हणाले.
































































