
चीनची राजधानी बीजिंगमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे बीजिंगमधील 31 रस्ते वाहून गेले. 136 गावांत वीज गायब झाली आहे. नद्या आणि नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. वेगवेगळय़ा ठिकाणी पावसात आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे.
मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला असून 80 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पावसामुळे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी मदतकार्य आणि बचावकार्य तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. बीजिंगच्या मियुन जिह्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या ठिकाणी 28 लोकांचा मृत्यू झाला तर यानचिंग जिह्यात दोन लोकांचा मृत्यू झाला.