
चीनने जगातील पहिले सहावे जनरेशनच्या फायटर जेटचा फोटो सार्वजनिक केला आहे. हे जेट खूपच आधुनिक, मोठे आणि पॉवरफुल मानले जात आहे. या जेटला चीनची कंपनी चेंगदू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन बनवत आहे. चीनने जारी केलेल्या फोटोमध्ये हे जेट टेकऑफ आधी रनवेवर उभे दिसत आहे. हे जेट अमेरिकेच्या एफ-35 हून अधिक धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.
या विमानाचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे या जेटमध्ये तीन इंजिन बसवले आहेत. मधले इंजिन हे बाकीच्या दोन इंजिनच्या तुलनेत मोठे आहे. यामुळे याची पॉवर, वेग आणि मोठी रेंज मिळण्याची शक्यता आहे. या जेटची डिझाईन जगातील कोणत्याही फायटर जेटपेक्षा वेगळी आहे. मिलिट्री वॉच मॅग्जिनच्या माहितीनुसार, युरोपमध्ये या जेटला जे-36 किंवा जे-एक्सएक्स म्हटले जाते. या जेटचा कॉन्फिगरेशन खूपच अत्याधुनिक आहे. याला जगातील सर्वात मोठे आणि सर्वात धोकादायक जेट म्हटले जात आहे. याची रेंज ही जवळपास 8 हजार किलोमीटरपर्यंत असू शकते. हे जेट विना रिफ्यूलिंग 4 हजार किलोमीटरपर्यंत लक्ष्याला भेदू शकते. नव्या फोटोमध्ये ट्विन मेन लँडिंग गिअर दिसत आहे. यात असलेला मोठा आकार आणि वजन याची प्रचीती देत आहेत.
चीनची आता अमेरिकेशी बरोबरी
चीनची फायटर इंजिन टेक्नोलॉजी ही आता अमेरिकेशी बरोबरी करणारी ठरली आहे. चीनचे जे-20 हे पाचव्या जनरेशनचे फायटर जेटने डिसेंबर 2025 मध्ये नव्या सीरियल इंजिन सोबत उड्डाण केले आहे. याचा थ्रस्ट रेश्यो आणि फ्युल एफिशिएन्सी अमेरिकेच्या एफ-35च्या इंजिन एफ135 च्या बरोबरची मानली जात आहे. हे इंजिन जुन्या अमेरिकी एफ119 हून जास्त पॉवरफुल आहे. चीनचे हे फायटर जेट 2030 पर्यंत लष्करात दाखल होईल.






























































