अमेरिका कंपन्यांमध्ये चीनच्या ‘996 वर्क कल्चर’ची एन्ट्री

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली कधीकाळी आरामदायक वर्क लाइफसाठी ओळखली जात होती, परंतु आता अमेरिकेतील काही कंपन्यासुद्धा कर्मचाऱ्यांची पिळवणूक करताना दिसत आहेत. अमेरिकेत हळूहळू चीनच्या ‘996 वर्क कल्चर’चा वापर केला जात आहे. चीनचे 996 हे मॉडेल म्हणजे कर्मचाऱ्यांना दररोज 12 तास काम तसेच आठवड्यात किमान 6 दिवस काम करावे लागते. चीनमध्ये हे वर्क कल्चर खूप लोकप्रिय होते. परंतु, यामुळे तेथील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर थेट दुष्परिणाम झाले. परंतु, हेच मॉडेल अमेरिकेतील टेक इंडस्ट्री आणि एआय स्टार्टअप्समध्ये येत आहे.

अमेरिकेतील काही एआय स्टार्टअप्सने हे मॉडेल स्वीकारले आहे. यामध्ये कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना आठवड्यात 70 तास काम करावे लागते. सॅन फ्रान्सिस्को येथील एआय स्टार्टअप रिलाने नोकरभरतीसाठी काढली आहे. यामध्ये स्पष्टपणे लिहिले की, जर तुम्ही आठवड्यात 70 तास काम करण्यासाठी तयार असाल तरच नोकरीसाठी अर्ज करा. अन्यथा अर्ज करू नका.

काय आहे 996 वर्क कल्चर?

996 वर्क कल्चर हे चीनमध्ये प्रसिद्ध आहे. या कल्चरमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजपर्यंत तसेच आठवड्यात 6 दिवस कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. या कल्चरमध्ये कामाचा ताण पडल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. अनेक कर्मचाऱ्यांना आजार होऊन त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे अनेक कंपन्यांनी हे कल्चर सोडून दिले. अमेरिकेतसुद्धा या कल्चरचा परिणाम दिसू शकतो.