विमा कंपनीतून बोलतोय सांगून 92 हजाराला गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मॅक्स लाईफ इन्शुरन्सच्या मुख्य शाखेतून बोलतेय सांगून तुम्हाला पाच लाख रूपयांचा बोनस लागू झाला असून तुमच्या पाचव्या हफ्त्याची 92 हजार  रूपये रक्कम भरायला लावून गंडा घातल्याची घटना चिपळूण येथे घडली.चिपळूण पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र शांताराम कदम वय 42 रा.पागमळा चिपळूण यांना मोबाईल संपर्क करून एका अज्ञात महिलेने मॅक्स लाईफ इन्शुरन्स मधून बोलतेय सांगून त्यांच्या विमा पॉलीसीचे नाव,पत्ता,जन्मतारीख आणि भरलेले हफ्ते याची  माहिती सांगितली.तसेच पाचवा हफ्ता 1 लाख 9 हजार 772 ऐवजी तो ९२ हजार 367 भरावा लागेल असे सांगताना 5 लाखाचा बोनसही तुम्हाला मिळणार असल्याचे सांगितले.त्यानंतर आरोपीने फिर्यादीला 92 हजार 367 रूपये खात्यात भरायला सांगितले. पैसे भरल्यानंतर पावती आणि त्यानंतर बोनसही न मिळल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कदम यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.