नाताळच्या प्रार्थनेत गाव तल्लीन असताना दोन बंगल्यांवर दरोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मध्यरात्री सगळ्या चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचं आयोजन केलं जातं

20 तोळे सोने आणि 60 हजारांची रोकड घेऊन चोरटे पसार

वसईत सध्या सर्वत्र नाताळची धूम पाहायला मिळत आहे. प्रार्थना आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठी सर्व लोक काल रात्रीपासून चर्चमध्ये होते. चोरांनी याच संधीचा फायदा घेत दोन मोठय़ा चोऱ्या केल्या आहेत.

वसईत सध्या सर्वत्र नाताळची धूम पाहायला मिळत आहे. प्रार्थना आणि नाताळच्या सेलिब्रेशनसाठी सर्व लोक काल रात्रीपासून चर्चमध्ये होते. चोरांनी याच संधीचा फायदा घेत दोन मोठय़ा चोऱया केल्या आहेत. नाताळच्या पहिल्या प्रार्थनेसाठी संपूर्ण कुटुंब आणि गाव चर्चमध्ये गेलेले असताना चोरांनी दोन बंगल्यांवर डल्ला मारला. दोन बंगल्यांमधील मिळून अंदाजे 60 हजार रोख आणि 20 तोळे सोने घेऊन चोरटे पसार झाले आहेत.

वसई – विरारमधील ख्रिस्तीबांधवांच्या घराघरात नाताळची धूम सुरू आहे. 24 डिसेंबरच्या रात्री प्रत्येकजण नाताळच्या पहिल्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जातो. पण हिच संधी साधत चोरांनी नालासोपारा पश्चिमेकडील नकाळे परिसरातील सराई या कुटुंबीयांच्या दोन बंगल्यांवर दरोडा टाकला आहे. दरवाजाची कडी तोडून घरातल्या कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोर फरार झाले आहेत. चर्चमधील प्रार्थनेनंतर घरी परतल्यावर ही घटना उघड झाली आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील नकाळे परिसरात संजाक सराई आणि ऍन्थोनी सराई यांचे बंगले आहेत. नाताळनिमित्त ही दोन्ही कुटुंबं रात्री सवा नऊच्या सुमारास प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेली होती. तसेच आजूबाजूचे गावकरीही चर्चमध्ये गेले होते. हीच संधी साधून चोरांनी संजाक सराई यांच्या बंगल्यातील सोने आणि रोख रक्कम तर ऍन्थोनी सरोई यांच्या बंगल्यातील रोख रक्कम आणि सोने घेऊन पळ काढला आहे.