अहमदपूर तालुक्यातील चोबळी नदीला पूर; मार्गावरील वाहतूक बंद

अहमदपूर तालुक्यातील चोबळी नदीला पूर आल्यामुळे वायगाव पाटी ते गादेवाडी हा रस्ता बंद झाला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदपूर तालुक्यात दमदार पाऊस पडतो आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. चोबळी नदीला पूर आल्यामुळे वायगाव पाटी ते गादेवाडी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहात आहे. ग्रामस्थांची अडचण झाली असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.