कोल्हापुरात नाताळ सण साजरा, कोरोनाच्या संकटातून सुटका करण्याची पार्थना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहर आणि जिल्ह्यात आज ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या उत्साहात नाताळ सण साजरा केला. कोरोना महामारींचे संकट असताना सॅनिटायजर, मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचा वापर करत चर्चमधून उपासना करण्यात आल्या. यावेळी हे प्रभू कोरोना महामारीच्या या संकटातून जगाची सुटका कर, सर्वांना आरोग्य दे, अशी प्रार्थना करण्यात आली.

न्यू शाहूपुरी येथील वायलडर मेमोरियल चर्च‌, क्राइस्टचर्च नागाळा पार्क, ब्रह्मपुरी येथील पवित्र उपासना मंदिर, विक्रमनगर ख्रिस्ती समाज, सेव्हन्थ डे चर्च, होली क्रॉस चर्च आदींसह शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक चर्चमध्ये नाताळ सण साजरा झाला.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी न्यू शाहूपुरी येथील वायलडर मेमोरियल चर्च मध्ये सकाळी आठपासून सायंकाळी सहा पर्यंत सहा सत्रांत सहा स्वतंत्र सत्रात प्रार्थना करण्यात आल्या. आचार्य डी. बी. समुद्रे,आचार्य जे. ए. हिरवे,आचार्य सिनोय, आचार्य गायकवाड आदींनी प्रार्थना सभांमध्ये पुढाकार घेतला.

christmas

संदेश आचार्य समुद्रे,आचार्य हिरवे यांनी दिला. यावेळी विल्डर मेमोरियल चर्चचे आनंद महाळुंगेकर, उदय विजापूरकर, संजय थोरात, विनय चोपडे, अतुल रुकडीकर,संदीप थोरात, सचिन समुद्ररे, विलास अष्टेकर आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. शहरातील सर्वच चर्चमधून भक्तीचे आयोजन करण्यात आले होते. कॅरोल सिंगिंग आणि फटाके यांना मात्र यंदाच्या वर्षी फाटा देण्यात आला. घरोघरी केक, डोनटसह मेजवानीचे आयोजन केले होते.

विशेष प्रार्थना

नाताळ सणाच्या दिवशी सर्व चर्चमधून आरोग्यासाठी विशेष प्रार्थना झाल्या. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या अनेक संकटा पासून मानवाची लवकरच मुक्तता व्हावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. सर्व प्रकारच्या संकटातून देशबांधवांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार यासह विविध अधिकारी लोकप्रतिनिधी यांना शक्ती मिळावी यासाठी ही प्रार्थना झाल्या.