कुछ तो गडबड है दया! ‘सीआयडी’च्या टीमची ‘दृश्यम 2’मध्ये एंट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 21 वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘सीआयडी’ ही मालिका बंद पडली तरी अजूनही या मालिकेला प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. अलीकडेच मालिकेतील एसीपी प्रद्युम्न (शिवाजी साटम), इन्स्पेक्टर दया (दयानंद शेट्टी), इन्स्पेक्टर अभिजित (आदित्य श्रीवास्तव) आणि मालिकेचे क्रिएटर बी. पी. सिंह यांचा एकत्रित पह्टो व्हायरल झाला होता. त्यामुळे सीआयडी मालिका पुन्हा सुरू होणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या.

अखेर सीआयडी टीम एकत्र येण्याचे कारण उलगडले आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित आणि अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘दृश्यम 2’ हा चित्रपट येत्या 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ‘सीआयडी’ची टीम मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सध्या त्यांचा एक नवा पह्टो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या पह्टोत एसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर अभिजित आणि इन्स्पेक्टर दया हे चौकशी कक्षात विजय साळगावकरची (अजय देवगण) चौकशी करताना दिसतायत. त्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.